वरील पात्रता निकष हे केवळ तुमच्या माहिती करिता असून, यात तुम्ही पात्र असाल तरच खालील बटन दाबून अधिकृत संकेत स्थळावर फॉर्म भरा,योग्य कागदपत्रे सादर करा,छानणी झाल्यानंतर तुम्हाला शासनाकडून पुढील कारवाईसाठी कळवले जाईल.
१. ज्या महिलांना ऑनलाइन अर्ज करता येत नसेल, त्यांच्यासाठी अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्यसेविका, सेतु सुविधा केंद्र, ग्रामसेवक, समूह संसाधन व्यक्ती (CRP), आशा सेविका, वॉर्ड अधिकारी, CMM (सिटी मिशन मॅनेजर), मनपा बालवाडी सेविका, मदत कक्ष प्रमुख किंवा आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. या अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. २. अर्जदाराचे नाव, जन्मतारीख आणि पत्ता याबाबतची माहिती आधार कार्डानुसार अचूक भरावी. तसेच बँकेचा तपशील आणि मोबाइल क्रमांक अचूकपणे नोंदवावा.