मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना साठी आवश्यक कागदपत्रे

ही माहिती मैत्रिणींसोबत शेअर करून मदत करा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संदर्भात आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना साठी आवश्यक कागदपत्रे majhi ladki bahin yojna latest-
majhi ladki bahin yojna required documents

१. आधार कार्ड अर्जामध्ये आधारकार्ड प्रमाणे नाव नमुद करावे

२. अधिवास प्रमाणपत्र

प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे (१५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड/१५ वर्षा पूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला) यापैकी कोणतेही एक.

३. महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे

(१५ वर्षापूर्वीचे रेशन कार्ड / १५ वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला/अधिवास प्रमाणपत्र) यापैकी कोणतेही एक.

४. वार्षिक उत्पन्न – रु. २.५० लाखापेक्षा कमी असणे आवश्यक

अ) पिवळी अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
ब) शुभ्र शिधापत्रिका असल्यास अथवा कोणतीही शिधापत्रिका नसल्यास वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापर्यंत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.

५. नवविवाहितेच्या बाबतीत

रेशनकार्डवर तिच्या नावाची नोंद नसल्यास विवाह प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य राहील.

६. बँक खाते तपशील

(खाते आधार लिंक असावे)

७. लाभार्थी महिलेचे हमीपत्र व फोटो

महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र

3 रा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई – 400032, महाराष्ट्र, भारत

माहिती
तपशील
योजनेचे नाव
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
आर्थिक मदत
₹१,५०० प्रति महिना
पात्र वयोगट
२१ ते ६५ वर्षे
अर्ज प्रक्रिया
ऑनलाइन आणि ऑफलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख
१ जुलै २०२४
अर्ज करण्याची अंतिम तारीख
१५ ऑक्टोबर २०२४
अधिकृत वेबसाइट
महाराष्ट्र लाडकी बहीण एप पोर्टल
लाडकी बहीण योजना अर्ज /फॉर्म