“लाडकी बहीण योजनेत कोणताही बदल नाही”, ७.७४ लाख महिलांना ५०० रुपये मिळणार – आदिती तटकरे

ही माहिती मैत्रिणींसोबत शेअर करून मदत करा

मुंबई :महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबतच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी स्पष्ट केले की लाडकी बहीण योजनेत कोणताही बदल केलेला नाही आणि नमो शेतकरी महानस्मान निधी योजनेच्या लाभार्थी ७,७४,१४८ महिलांना दरमहा ५०० रुपये देण्यात येणार आहेत.

"लाडकी बहीण योजनेत कोणताही बदल नाही", ७.७४ लाख महिलांना ५०० रुपये मिळणार - आदिती तटकरे maharashtra-ladki-bahin-scheme-no-changes-clarification
maharashtra-ladki-bahin-scheme-no-changes-clarification

लाडकी बहीण योजना दीड हजार वरून 500 रुपये मिळणार का? बाबत आदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर पोस्ट करून स्पष्ट केले:
“२८ जून २०२४ आणि ३ जुलै २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार, इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत १,५०० रुपये दरमहा दिले जात आहेत. ज्या महिला इतर योजनांतून १,५०० रुपयांपेक्षा कमी लाभ घेत आहेत, त्यांना फरकाची रक्कम दिली जाते.”

संख्या बाबत स्पष्टता

तटकरे यांनी स्पष्ट केले की:नमो शेतकरी सन्मान योजनेतून १,००० रुपये घेणाऱ्या ७,७४,१४८ महिलांना अतिरिक्त ५०० रुपये दिले जात आहेत

त्यांनी असेही म्हटले की ३ जुलै २०२४ नंतर सदर योजनेमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.

विधिमंडळाच्या अधिवेशनात हे स्पष्टीकरण आधीच दिले गेले आहे

शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया:

मंत्री शंभूराज देसाई यांनी योजनेबाबत म्हटले:
“आमच्या लाडक्या बहिणींची किंमत १,५०० रुपयांत किंवा ५ लाख रुपयांतही मोजता येणार नाही. ही भाऊबीज-रक्षाबंधनाची भेट आहे. संजय राऊत यांना ५०० रुपये किंवा १,५०० रुपये यावर चर्चा करायची आहे, पण राज्य सरकारने अधिकृत भूमिका घेतली आहे.”

विरोधकांवर टीका:

तटकरे यांनी विरोधकांवर टीका करत म्हटले:
“विरोधकांचे प्रशासकीय आकलन कच्चे आहे किंवा योजनेच्या यशाने त्यांचे मनोबल खचले आहे. माझ्या लाडक्या बहिणी या अपप्रचाराला बळी पडणार नाहीत.”

लाडकी बहीण योजना बाबत माहिती

माहितीतपशील
योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
आर्थिक मदत₹१,५०० प्रति महिना
पात्र वयोगट२१ ते ६५ वर्षे
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख१ जुलै २०२४
अर्ज करण्याची अंतिम तारीख१५ ऑक्टोबर २०२४
अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहीण एप पोर्टलNariDootApp
लाडकी बहीण योजना अर्ज /फॉर्मdownload

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना २१०० रु रक्कम कधी वाढेल? आदिती तटकरेंचे स्पष्टीकरण