मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मार्च चा दूसरा हप्ता मिळायला सुरुवात झाली आहे.अनेक महिलांना आजच दुसऱ्या हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत.तुमच्या खात्यात दुसऱ्या हप्त्याचे म्हणजे मार्च चे 1500 रुपये जमा झाले का? चेक करून पाहा.दुसरीकडे 2100 रुपयांच्या हप्त्यावरून आज सभागृहात चर्चा झाली.महाराष्ट्र विधानसभेत लाडक्या बहिणी योजनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहित पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वरुण सरदेसाई यांच्यात अदिती तटकरे यांच्याशी वाद झाला. या योजनेत महिलांना प्रति महिना 1500 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे, परंतु 2100 रुपये कधी देणार याचा प्रश्न विचारला गेला.

Table of Contents
मुख्य मुद्दे:
- लाडक्या बहिणी योजना: ही योजना महायुतीने आणली आहे आणि त्यात महिलांना प्रति महिना 1500 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे.
- वादाचे कारण: रोहित पवार आणि वरुण सरदेसाई यांनी अदिती तटकरे यांना विचारले की लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार? त्यावर तटकरे यांनी स्पष्ट केले की नमो सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.
- राजकीय वाद या योजनेच्या वादामुळे राजकीय भांडण उकरून आले आहे. विरोधकांनी या योजनेच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
लाडक्या बहिणी योजनेच्या अंमलबजावणीबाबत विरोधकांनी प्रश्न विचारल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे.
अदिती तटकरे यांनी या योजनेच्या लाभाची माहिती दिली आहे, तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत 2100 रुपयांचा लाभ केव्हा मिळणार याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे निर्णय घेतील असेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
आदिती तटकरेंची आकडेवारी
आदिती तटकरे यांनी या प्रश्नांना आकडेवारी मांडत उत्तर दिले.
“ऑक्टोबर २०२४ मध्ये आचारसंहितेच्या आधी लाडकी बहीण योजनेच्या २ कोटी ३३ लाख ६४ हजार लाभार्थी महिला होत्या.
फेब्रुवारीत हप्ता देताना लाभार्थी महिलांचा आकडा २ कोटी ४७ लाखाहून जास्त आहे. याचा अर्थ असा की, लाभार्थी महिलांचा आकडा वाढला आहे.”
२१०० रुपयांचं काय होणार?
२१०० रुपयांच्या हप्त्याबाबत आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले, “महायुती सरकारने ही योजना आणली आहे. स्त्रियांना १५०० रुपयांचा लाभ देणारे महायुतीचे एकमेव सरकार आहे. महिलांना हा लाभ कायम मिळत राहणार आहे. २१०० रुपयांसंदर्भात आमचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून योग्य वेळी निर्णय घेतील.परंतु लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही.”
देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण
अर्थसंकल्प सादरीकरणानंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१०० रुपयांच्या हप्त्याबाबत स्पष्ट केले, “लाडकी बहीण योजनेसाठीचा हप्ता २१०० करण्याबाबत आमचं काम चालू आहे. पण त्याचवेळी अर्थसंकल्पाचं संतुलन कायम राखणंही महत्त्वाचं आहे. लाडकी बहीण सारख्या योजना जर शाश्वत पद्धतीनं कायमस्वरूपी चालू ठेवायच्या असतील, तर आर्थिक शिस्तही महत्त्वाची आहे. त्यामुळे योजनेच्या संदर्भात व्यवस्थितरित्या संतुलन करत आम्ही दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करणार आहोत. याचा अर्थ एप्रिल महिन्यात १५०० रुपयेच मिळणार. ज्यावेळी आम्ही २१०० रुपयांची घोषणा करू तेव्हापासून मिळणार.”
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संदर्भात महत्वाची माहिती खालीलप्रमाणे
माहिती | तपशील |
---|---|
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
आर्थिक मदत | ₹१,५०० प्रति महिना |
पात्र वयोगट | २१ ते ६५ वर्षे |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | १ जुलै २०२४ |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | १५ ऑक्टोबर २०२४ |
अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहीण एप पोर्टल | NariDootApp |
लाडकी बहीण योजना अर्ज /फॉर्म | download |