मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अपात्रता निकष

ही माहिती मैत्रिणींसोबत शेअर करून मदत करा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अपात्रता निकष संदर्भात सरकारने नियमावली जाहीर केली आहे.त्याप्रमाणे खालील नियम लागू असणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत अपात्र घोषित केले जाईल.

१. उत्पन्न मर्यादा ओलांडणारे कुटुंब: ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ₹२.५० लाख पेक्षा अधिक आहे.

२. आयकरदाता सदस्य: कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरत असेल.

३. सरकारी/नियमित नोकरीदार: कुटुंबातील सदस्य सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ किंवा स्थानिक संस्थेत कायम/नियमित कर्मचारी किंवा निवृत्तीवेतनधारक असल्यास. (स्वीकृत अपवाद: बाह्य यंत्रणेद्वारे ₹२.५ लाख पर्यंत उत्पन्न असलेले कंत्राटी कर्मचारी, स्वयंसेवक यांना पात्रता).

४. इतर योजनांमधील लाभ: लाभार्थी महिला शासनाच्या इतर योजनांतर्गत दरमहा ₹१,५०० किंवा अधिक रक्कम घेत असल्यास.

५. राजकीय प्रतिनिधित्व: कुटुंबात विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार असल्यास.

६. सरकारी संस्थांमध्ये पद: कुटुंबातील सदस्य भारत किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/उपक्रमांमध्ये अध्यक्ष, संचालक इत्यादी पदावर असल्यास.

७. चारचाकी वाहन मालकी: कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) नोंदणीकृत असल्यास.

टीप: वरीलपैकी कोणतीही एक अट लागू असल्यास अर्जदार लाडकी बहीण योजना अंतर्गत अपात्र ठरतील.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

माहितीतपशील
योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
आर्थिक मदत₹१,५०० प्रति महिना
पात्र वयोगट२१ ते ६५ वर्षे
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख१ जुलै २०२४
अर्ज करण्याची अंतिम तारीख१५ ऑक्टोबर २०२४
अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहीण एप पोर्टल NariDootApp
लाडकी बहीण योजना अर्ज /फॉर्म download