महाराष्ट्र माझी लाडकी बहीण योजना २०२४: राज्य अर्थसंकल्पातील मोठी घोषणा
महाराष्ट्राच्या २०२४ च्या अर्थसंकल्पात सर्वात मोठी घोषणा म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश राज्यातील महिला आणि मुलींना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनवणे आहे. या योजनेअंतर्गत, पात्र महिलांना राज्य सरकारकडून दरमहा ₹१,५०० थेट त्यांच्या बँक खात्यात प्रदान केले जाणार आहे.
योजनेची मुख्य माहिती:
- योजनेचे नाव: महाराष्ट्र लाडकी बहीण योजना
- सुरू केली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- राज्य: महाराष्ट्र
- वर्ष: २०२४
- लाभार्थी: राज्यातील गरीब आणि निराधार महिला
- उद्देश: गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि स्वावलंबी बनवणे
- आर्थिक मदत: ₹१,५०० प्रति महिना
- अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन आणि ऑफलाइन
- योजनेचा प्रारंभ दिनांक: १ जुलै २०२४
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: १५ ऑक्टोबर २०२४
- अधिकृत वेबसाइट: ladkibahin.maharashtra.gov.in
- पोर्टल: Narishakti Doot
योजनेचा उद्देश:
या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि स्वरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आहे.
पात्रता अटी:
१. निवास: लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.
२. वय: २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिला पात्र आहेत.
३. वैवाहिक स्थिती: विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा निराधार महिला अर्ज करू शकतात.
४. बँक खाते: लाभार्थी महिलेकडे बँक खाते असणे आवश्यक आहे.
५. उत्पन्न मर्यादा: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख (अडीच लाख) पेक्षा जास्त नसावे.
आवश्यक कागदपत्रे:
१. लाभार्थीचे आधार कार्ड
२. निवास प्रमाणपत्र (डोमिसाईल प्रमाणपत्र, जन्म दाखला, राशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र)
३. सक्षम अधिकाऱ्याकडून दिलेला उत्पन्न दाखला
४. बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत
५. फोटो (ई-केवायसीसाठी)
६. राशन कार्ड
७. स्व-घोषणापत्र (पात्रता अटींचे पालन करण्याबद्दल)
अर्ज कसा करायचा?
पात्र महिला ऑनलाइन अर्ज करू शकतात. ज्या महिलांना ऑनलाइन अर्ज करता येत नाही, त्यांसाठी खालील ठिकाणी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे:
- आंगणवाडी केंद्रे
- सेतू सुविधा केंद्रे
- ग्रामपंचायत कार्यालय
- वार्ड कार्यालय
- बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय
अर्ज प्रक्रिया निशुल्क आहे. अर्ज करताना महिलांनी स्वतःची ओळखपत्रे (आधार कार्ड आणि रेशन कार्ड) सोबत घेऊन उपस्थित राहावे.
कोण अपात्र आहे?
१. ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख पेक्षा जास्त आहे.
२. ज्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतात.
३. ज्या कुटुंबातील सदस्य सरकारी विभाग, सार्वजनिक उपक्रम किंवा स्थानिक संस्थांमध्ये नोकरी करतात किंवा निवृत्त झाले आहेत.
४. ज्या महिला शासनाच्या इतर योजनांतर्गत लाभ घेत आहेत.
५. ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार/खासदार आहेत.
६. ज्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे पाच एकरांपेक्षा जास्त शेतजमीन आहे.
७. ज्या कुटुंबात चार चाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) आहे.
महत्त्वाच्या तारखा:
- योजनेचा प्रारंभ दिनांक: १ जुलै २०२४
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: १५ ऑक्टोबर २०२४
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट भेट द्या: ladkibahin.maharashtra.gov.in.
योजनेसंबंधी तक्ता: Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana
माहिती | तपशील |
---|---|
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
आर्थिक मदत | ₹१,५०० प्रति महिना |
पात्र वयोगट | २१ ते ६५ वर्षे |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | १ जुलै २०२४ |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | १५ ऑक्टोबर २०२४ |
अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहीण एप पोर्टल | NariDootApp |
लाडकी बहीण योजना अर्ज /फॉर्म | download |
ही योजना महाराष्ट्रातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यासाठी एक महत्त्वाची पाऊल आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांनी वेळेत अर्ज करावा.