निवडणुकीपूर्वी महायुतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची रक्कम १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. प्रचंड बहुमताने सत्तेवर येऊनही १०० दिवस उलटून गेल्यानंतरही ही रक्कम वाढली नसल्याने लाभार्थ्यांमध्ये प्रश्न निर्माण झाले आहेत. या संदर्भात महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी बीबीसी मराठीच्या ‘राष्ट्र-महाराष्ट्र’ कार्यक्रमात सविस्तर माहिती दिली.
महायुती सरकारच्या १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बीबीसी मराठीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात आदिती तटकरेंनी स्पष्ट केले की, “या योजनेला दीर्घकालीन टिकाऊ बनवणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. १५०० किंवा २१०० रुपयांच्या चर्चेपेक्षा योजना यशस्वीरित्या राबविणे महत्त्वाचे आहे.”
निवडणुकीनंतर निकष बदलल्याचा आरोप खोटा
त्यांनी पुढे म्हटले, “ही योजना काही महिन्यांसाठी नसून अनेक वर्षे चालविण्याची आमची योजना आहे. राज्यातील सुमारे २.५ कोटी महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत. त्यांना कमाल फायदा मिळावा यावर भर दिला जात आहे. साथ महिलांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करणेही आमच्या लक्ष्यात आहे.”
निवडणुकीनंतर योजना बंद पडेल अशी महाविकास आघाडीची टीका आणि ‘कॅश फॉर व्होट’चे आरोप यावर तटकरेंनी प्रतिक्रिया देताना म्हटले, “विरोधकांनी सुरुवातीपासूनच या योजनेबाबत गैरसमज निर्माण केले आहेत. योजना सुरू करताना जे निकष होते तेच आजही लागू आहेत. जुलैपासूनच अर्ज तपासणी सुरू होती, त्यामुळे निवडणुकीनंतर निकष बदलल्याचा आरोप खोटा आहे.”
पायाभूत सुविधांसाठीच्या निधीवर याचा काही परिणाम झालेला नाही
गैरलाभ घेणाऱ्यांच्या बाबतीत तटकरेंनी स्पष्ट केले, “ज्यांनी एकाच लाभार्थ्याने अनेक नावे टाकली होती किंवा गैरफायदा घेतला होता, अशांचीच नावे वगळली आहेत. केवळ पैसे देणे नव्हे तर महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हे आमचे ध्येय आहे.”
कार्यक्रमात उपस्थित असलेले उद्योगमंत्री उदय सामंत यांनी योजनेचे महत्त्व सांगताना म्हटले, “१५०० रुपये काही महिलांसाठी १५ लाख रुपयांइतके महत्त्वाचे ठरतात. मला भेटलेल्या एका महिलेने सांगितले की या योजनेतून मिळालेल्या पैशांमुळे तिच्या वडिलांचा हृदयविकाराच्या वेळी जीव वाचला. पायाभूत सुविधांसाठीच्या निधीवर याचा काही परिणाम झालेला नाही.”
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संदर्भात महत्वाची माहिती खालीलप्रमाणे
माहिती | तपशील |
---|---|
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
आर्थिक मदत | ₹१,५०० प्रति महिना |
पात्र वयोगट | २१ ते ६५ वर्षे |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | १ जुलै २०२४ |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | १५ ऑक्टोबर २०२४ |
अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहीण एप पोर्टल | NariDootApp |
लाडकी बहीण योजना अर्ज /फॉर्म | download |
२१०० रुपयांसंदर्भात लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरे यांचं अधिवेशनात निवेदन