“मुख्यमंत्र्यांच्या ‘पिंक ई-रिक्षा योजने’चा नागपूरमध्ये शुभारंभ; 10,000 महिलांना मिळणार स्वतःची इलेक्ट्रिक रिक्षा!”

ही माहिती मैत्रिणींसोबत शेअर करून मदत करा

20 एप्रिल 2025 | नागपूर : महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या योजनेअंतर्गत राज्यातील 10,000 गरजू महिलांना “पिंक ई-रिक्षा” वाटप करण्यात येत आहे. आज (20 एप्रिल) नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते या योजनेचा औपचारिक शुभारंभ झाला. या पायाभूत उपक्रमाद्वारे महिलांना स्वावलंबी बनवण्यासोबतच त्यांना सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याचे ध्येय आहे.

8 जिल्ह्यांमध्ये 10,000 पिंक ई-रिक्षा वाटली जाणार

या योजनेअंतर्गत नागपूर, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर (धुळे), आणि अमरावती या 8 जिल्ह्यांमध्ये महिलांना सवलतीच्या दरात ई-रिक्षा पुरवल्या जातील. यामध्ये:

सरकारी अनुदान: रिक्षाच्या एकूण किमतीपैकी 20%

लाभार्थीची देय रक्कम: 10%

उर्वरित 70% रक्कम: सवलतीच्या व्याजदरावर कर्ज म्हणून

महिलांच्या सुरक्षित प्रवासाची हमी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “ही योजना ‘लाडकी बहीण योजना’सारखीच आहे. याद्वारे महिलांना स्वावलंबी बनवणे, रात्रीच्या वेळी सुरक्षित प्रवासाची सोय निर्माण करणे आणि महिला चालकांद्वारे इतर महिलांसाठी सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट आहे.”

त्यांनी स्पष्ट केले की, “या रिक्षा फक्त महिलांसाठीच आहेत, असे नाही. पुरुषही यात प्रवास करू शकतात. परंतु, महिलांनी या रिक्षा व्यवस्थित चालवून सर्व प्रवाशांना सुरक्षिततेची हमी द्यावी.”

नागपूरमध्ये 2,000 महिलांना लाभ

या योजनेच्या पहिल्या टप्प्यात नागपूरमधील 2,000 महिलांना पिंक ई-रिक्षा वाटप करण्यात आल्या आहेत. पुढील काळात इतर जिल्ह्यांमध्येही ही योजना राबविण्यात येईल.

योजनेची मुख्य वैशिष्ट्ये:

✔ स्वावलंबन: महिलांना स्वतःचे रोजगार निर्माण करण्याची संधी.
✔ सुरक्षितता: महिला चालक असलेल्या रिक्षामुळे महिला प्रवाशांना रात्रीही सुरक्षित वाहतूक.
✔ सवलतीचे कर्ज: 70% रक्कम कमी व्याजदरावर उपलब्ध.

मुख्यमंत्र्यांचा आवाहन

देवेंद्र फडणवीस यांनी लाभार्थी महिलांना शुभेच्छा देत म्हटले, “आपण आपल्या घरासमोरच्या जबाबदाऱ्या जशी कुशलतेने पार पाडता, तशीच ही ई-रिक्षाही यशस्वीरित्या चालवा आणि समाजात स्वावलंबनाचे संदेश पोहोचवा.”

माहितीतपशील
योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
आर्थिक मदत₹१,५०० प्रति महिना
पात्र वयोगट२१ ते ६५ वर्षे
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख१ जुलै २०२४
अर्ज करण्याची अंतिम तारीख१५ ऑक्टोबर २०२४
अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहीण एप पोर्टलNariDootApp
लाडकी बहीण योजना अर्ज /फॉर्मdownload