Table of Contents
Mukhymantri Ladki Bahin Yojana Toll Free Number | लाडकी बहीण योजना टोल फ्री नंबर : महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी सुरू केलेली माझी लाडकी बहीण योजना राज्यभरात सुपरहिट ठरली आहे. ही योजना विधानसभा निवडणुकीदरम्यान गेम चेंजर ठरली आणि शासनाला भरघोस यश मिळाले.
राज्य शासनाकडून राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत 7 हप्ते वितरित करण्यात आले आहेत. या हप्त्यांमध्ये पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात आले आहेत.
आतापर्यंत सर्व पात्र महिलांना 10,500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. तरीही, काही महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे आतापर्यंत जमा झाले नाहीत, तसेच काही महिलांचे अर्ज अजूनही पेंडिंग आहेत.
अशा महिलांसाठी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून फोन नंबर, संपर्क पत्ता, ईमेल आणि इतर माहिती या पोस्टमध्ये दिली जात आहे. त्यासाठी तुम्हाला ही पोस्ट शेवटपर्यंत वाचावी लागेल.
लाडकी बहिणींना आतापर्यंत 10,500 रुपये वाटप | लाडकी बहीण योजना 7वा हप्ता स्थिती
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना आतापर्यंत सात हप्ते त्यांच्या आधार डीबीटी लिंक असलेल्या बँक खात्यात शासनाकडून जमा करण्यात आले आहेत. आतापर्यंत एकूण 10,500 रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत.
निवडणुकीदरम्यान महायुतीने घोषणा केली होती की लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये हप्ता वाढवून 2100 रुपये करण्यात येईल. या संदर्भात अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पात या घोषणेबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, अशी माहिती दिली आहे.
लाडकी बहीण योजनेचा हप्ता आतापर्यंत मिळाला नाही तर कुठे संपर्क करावा? | लाडकी बहीण योजना टोल फ्री नंबर

माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत ज्या महिलांना एकही हप्ता मिळाला नाही किंवा ज्या महिलांना मागच्या महिन्याचा हप्ता मिळाला नाही, अशा महिलांनी राज्य शासनाने ठरवून दिलेल्या लाडकी बहीण योजनेसाठीच्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधून तक्रार किंवा निवेदन करू शकतात. Mukhymantri Ladki Bahin Yojana Toll Free Number |(लाडकी बहीण योजना टोल फ्री नंबर)
लाडकी बहीण योजनेच्या या नंबरवर संपर्क साधून आपल्या समस्येचे निराकरण करू शकता.
┌──────────────────────────────────────────────────────────────────┐
│ संपर्क प्रकार │ माहिती
├──────────────────────────────────────────────────────────────────┤
│ टोल फ्री नंबर │ 181 (योजनेसंबंधी प्रश्नांसाठी)
├──────────────────────────────────────────────────────────────────┤
│ टोल फ्री नंबर │ 1800 120 8040 (सीएम हेल्पलाइन नंबर 24*7)
├──────────────────────────────────────────────────────────────────┤
│ ईमेल │ cm@maharashtra.gov.in
├──────────────────────────────────────────────────────────────────┤
│ ईमेल │ psec.wchd@maharashtra.gov.in
├──────────────────────────────────────────────────────────────────┤
│ वेबसाइट │ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना
├──────────────────────────────────────────────────────────────────┤
│ पत्ता – महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र
│ 3रा मजला, नवीन प्रशासकीय इमारत,
│ मदाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक,
│ मुंबई – 400032, महाराष्ट्र, भारत
└──────────────────────────────────────────────────────────────────┘
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संदर्भात महत्वाची माहिती खालीलप्रमाणे
माहिती | तपशील |
---|---|
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
आर्थिक मदत | ₹१,५०० प्रति महिना |
पात्र वयोगट | २१ ते ६५ वर्षे |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | १ जुलै २०२४ |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | १५ ऑक्टोबर २०२४ |
अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहीण एप पोर्टल | NariDootApp |
लाडकी बहीण योजना अर्ज /फॉर्म | download |