२१०० रुपयांसंदर्भात लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरे यांचं अधिवेशनात निवेदन

ही माहिती मैत्रिणींसोबत शेअर करून मदत करा

“२१०० रुपयांसंदर्भात मुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतील”, लाडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरे यांचं अधिवेशनात निवेदन

लाडकी बहीण योजना आदिती तटकरे यांचे निवेदन

महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना योजनेसंदर्भात विधानसभेत महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, “महायुती सरकारने महिलांना १५०० रुपयांचा लाभ देणारी एकमेव सरकार आहे. २१०० रुपयांच्या हप्त्याबाबत मुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेतील.”

विरोधकांच्या प्रश्नांना आदिती तटकरेंचं उत्तर

विरोधकांनी लाडकी बहीण योजनेतून काही लाभार्थी महिलांना वगळण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले, “लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय जारी करतानाच नमूद करण्यात आले होते की, ज्या महिलांना इतर योजनांतून १५०० रुपयांपेक्षा जास्त लाभ मिळत असेल, त्यांना लाडकी बहीण योजना लागू होणार नाही.”

त्यांनी पुढे स्पष्ट केले, “नमो शेतकरी महिला योजना अंतर्गत महिलांना १००० रुपयांचा लाभ मिळतो. शासन निर्णयानुसार प्रत्येक पात्र महिलेला किमान १५०० रुपयांचा लाभ मिळायला हवा. त्यामुळे नमो शेतकरी महिला योजनेतील लाभार्थी महिलांना त्या योजनेतून १००० रुपये तर लाडकी बहीण योजनेतून ५०० रुपये मिळतात. त्यामुळे त्यांना योजनेतून वगळण्यात आलेले नाही. २० ते २५ लाख महिला लाभार्थ्यांना वगळण्यात आल्याचे आकडे अफवा आहेत.”

वरुण सरदेसाईंचे तीन प्रश्न

शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात विधानसभेत तीन प्रश्न विचारले:
१. निवडणुकीपूर्वी योजना जाहीर करताना किती लाभार्थी होते?
२. निवडणुकीनंतर निकष लागू केल्यामुळे किती महिलांना अपात्र केले गेले?
३. सरकारने सांगितल्याप्रमाणे महिलांना २१०० रुपये देणार का?

आदिती तटकरेंची आकडेवारी

आदिती तटकरे यांनी या प्रश्नांना आकडेवारी मांडत उत्तर दिले.

“ऑक्टोबर २०२४ मध्ये आचारसंहितेच्या आधी लाडकी बहीण योजनेच्या २ कोटी ३३ लाख ६४ हजार लाभार्थी महिला होत्या.

फेब्रुवारीत हप्ता देताना लाभार्थी महिलांचा आकडा २ कोटी ४७ लाखाहून जास्त आहे. याचा अर्थ असा की, लाभार्थी महिलांचा आकडा वाढला आहे.”

२१०० रुपयांचं काय होणार?

२१०० रुपयांच्या हप्त्याबाबत आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले, “महायुती सरकारने ही योजना आणली आहे. स्त्रियांना १५०० रुपयांचा लाभ देणारे महायुतीचे एकमेव सरकार आहे. महिलांना हा लाभ कायम मिळत राहणार आहे. २१०० रुपयांसंदर्भात आमचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून योग्य वेळी निर्णय घेतील.परंतु लाडक्या बहि‍णींची फसवणूक होणार नाही.”

देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण

अर्थसंकल्प सादरीकरणानंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१०० रुपयांच्या हप्त्याबाबत स्पष्ट केले, “लाडकी बहीण योजनेसाठीचा हप्ता २१०० करण्याबाबत आमचं काम चालू आहे. पण त्याचवेळी अर्थसंकल्पाचं संतुलन कायम राखणंही महत्त्वाचं आहे. लाडकी बहीण सारख्या योजना जर शाश्वत पद्धतीनं कायमस्वरूपी चालू ठेवायच्या असतील, तर आर्थिक शिस्तही महत्त्वाची आहे. त्यामुळे योजनेच्या संदर्भात व्यवस्थितरित्या संतुलन करत आम्ही दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करणार आहोत. याचा अर्थ एप्रिल महिन्यात १५०० रुपयेच मिळणार. ज्यावेळी आम्ही २१०० रुपयांची घोषणा करू तेव्हापासून मिळणार.”

माहितीतपशील
योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
आर्थिक मदत₹१,५०० प्रति महिना
पात्र वयोगट२१ ते ६५ वर्षे
अर्ज प्रक्रियाऑनलाइन आणि ऑफलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख१ जुलै २०२४
अर्ज करण्याची अंतिम तारीख१५ ऑक्टोबर २०२४
अधिकृत वेबसाइटladkibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र लाडकी बहीण एप पोर्टलNariDootApp
लाडकी बहीण योजना अर्ज /फॉर्मdownload