महाराष्ट्रातील लाडकी बहिन योजनेअंतर्गत यंदा महिलांना मासिक २१०० रुपये देण्याचे आश्वासन पूर्ण होणार नाही, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत दिली. त्यांनी स्पष्ट केले की, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा लाभ लाभार्थी महिलांच्या खात्यात ८ मार्चपर्यंत जमा होईल. शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) येथील आमदार अनिल परब यांनी मांडलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तटकरे यांनी सांगितले, “या योजनेचा निर्णय जुलै-ऑगस्ट २०२३ मध्ये जाहीर झाल्यापासून कोणत्याही निकषात बदल केलेला नाही. छाननी प्रक्रिया सुरू असताना इतर योजनांच्या लाभार्थ्यांची आकडेवारी ज्याप्रमाणे विभागाकडे मिळत गेली, त्यानुसार अपात्र अर्ज रद्द करण्यात आले.”
अपात्र ठरलेल्या महिलांवर स्पष्टता
अदिती तटकरे यांनी नमूद केले की, ६५ वर्षे पूर्ण झालेल्या महिला योजनेतून आपोआप अपात्र ठरतील. तसेच, विवाहानंतर इतर राज्यांत स्थायिक झालेल्या महिला आणि बनावट खात्याद्वारे नोंदणी केलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी जोर देत म्हटले, “कोणत्याही लाडकी बहिनीवर अन्याय होणार नाही. लाभ परत घेण्याची शासनाची भूमिका नाही.”
२,१०० रुपयांच्या आश्वासनावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
महायुतीच्या जाहीरनाम्यात लाडकी बहिन योजनेच्या अंतर्गत महिलांना मासिक २१०० रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. यावर विरोधकांनी “हा लाभ कधी मिळेल?” असा प्रश्न विधानपरिषदेत उपस्थित केला. यावर अदिती तटकरे यांनी उत्तर दिले, “जाहीरनामा पाच वर्षांच्या कालावधीसाठी असतो. अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी जेव्हा यासाठी प्रस्ताव मांडेल, तेव्हाच हा लाभ दिला जाईल. यंदाच्या अर्थसंकल्पात २१०० रुपये देण्याची घोषणा केलेली नाही.” या बयानानुसार, सध्या महिलांना मासिक १,५०० रुपयेचाच लाभ मिळत राहील, ज्यामुळे लाभार्थींमध्ये निराशा पसरल्याची शक्यता आहे.
योजनेची सद्यस्थिती
सध्या २.५४ कोटी महिला योजनेच्या लाभार्थी आहेत.
अपात्र ठरवण्यात आलेल्या अर्जांची संख्या सरकारने स्पष्ट केली नाही.
बनावट नोंदणीवर तातडीने कारवाईचे आश्वासन देण्यात आले.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana
माहिती | तपशील |
---|---|
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
आर्थिक मदत | ₹१,५०० प्रति महिना |
पात्र वयोगट | २१ ते ६५ वर्षे |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | १ जुलै २०२४ |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | १५ ऑक्टोबर २०२४ |
अधिकृत वेबसाइट | ladkibahin.maharashtra.gov.in |
महाराष्ट्र लाडकी बहीण एप पोर्टल | NariDootApp |
लाडकी बहीण योजना अर्ज /फॉर्म | download |
आपल्या @ladkibahinyojnamaharashtra या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
First Published by Team Ladki bahin Yojna Maharashtra on MAR 05,2024 | 20:36 PM
WebTitle – ladki-bahin-yojana-no-increase-2100-rs-aditi-tatkare-clarifies